Puzzle Therapy : तणावमुक्तीसाठी अमेरिकेत पझल थेरपीची क्रेझ! | पुढारी

Puzzle Therapy : तणावमुक्तीसाठी अमेरिकेत पझल थेरपीची क्रेझ!

न्यूयॉर्क : तणावात आयुष्य घालवणे हे दिवसभर एक पाकीट सिगारेट पिण्याइतके धोकादायक असते, असे अनेक अभ्यासात आढळून आले आहे. याच तणावातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिक पझल थेरपीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करत आले आहेत. अलीकडेच स्प्रिंगवेली सिनिअर सेंटरच्या ज्येष्ठांनी 60 हजार पिसेसचे पझल पूर्ण केले. यावेळी त्यांच्यासाठी पेंटिंगची शिबिरे, कलात्मकतेला वाव देणारे उपक्रम आणि बुस्ट यूवर ब्रेन कवायतींचा समावेश होता. मात्र, पझल पूर्ण करत असताना या सर्वांवरील तणाव अधिक प्रमाणात कमी झाला असल्याचे आढळून आले.

‘पझल थेरपीच्या’ या अनोख्या उपक्रमात प्रारंभी 1 हजार पिसेसचे छोटे पझल सोडवले जाते. त्यानंतर वॉट अ वंडरफुल वर्ल्ड हे 60 हजार पिसेसचे पझल सोडवले जाते. या पझलची लांबी 29 फूट व उंची 8 फूट इतकी आहे. याचप्रमाणे त्यात 187 विभिन्न पेंटिंग्ज आहेत. हे पझल 120 जणांनी तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले आणि यादरम्यान यात सहभागी सर्व व्यक्तींमधील ताणतणाव कमालीचा कमी झाल्याचे अभ्यासात आढळून आले.

Back to top button