मँचेस्टर पोलिस खात्यात 6 फुटी अश्व! | पुढारी

मँचेस्टर पोलिस खात्यात 6 फुटी अश्व!

मँचेस्टर : पोलिस दलात अश्वाचा समावेश असणे यात नवे काहीच नाही. भारतातच नव्हे तर जगभरात अनेक घोडदळे सर्रास दिसून येतात. ब्रिटनमधील पोलिस खात्यासाठी अगदी अलीकडे एका सहा फुटी अश्वाचा समावेश केला गेला. मात्र, याचा समावेश होताच नवा इतिहास रचला आहे. याचे कारण असे की, ज्या पोलिस दलात त्याचा समावेश झाला, त्या दलाच्या 50 वर्षांच्या इतिहासात इतका उंच अश्व कधीही दाखल झालेला नाही.

ग्रेटर मँचेस्टर पोलिस खात्याच्या वेबसाईटनुसार, पोलिसांच्या टॅक्टिकल माऊंटेड युनिटमध्ये ट्रूपर नावाच्या या अश्वाचा समावेश केला गेला आहे. माऊंटेड युनिटच्या रीतीरिवाजानुसार यात दाखल होणार्‍या प्रत्येक घोड्याचे नाव बदलले जाते. ती परंपरा कायम राखत या 6 फुटी अश्वाला चार्ल्स डिकेन्सच्या कादंबरीतील व्यक्तिरेखा ट्रूपरचे नाव दिले गेले.

6 फूट 2 इंच इतकी ताडमाड उंचीच्या या घोड्यामुळे पोलिस विभागाला आपल्या तबेल्यातही अनुरूप बदल करवून घ्यावे लागले आहेत. फोर्स ड्रेनर अ‍ॅलिस्टर हंस्टोन यांनी दिलेल्या माहितीनुसार या घोड्याचा आहारदेखील तितकाच तगडा आहे. ब्रिटिश दलाने मात्र ट्रूपरचे उत्साहात स्वागत केले असून, यामुळे दलाचा लौकिक आणखी वाढला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Back to top button