‘इथे’जमिनीखाली राहतात लोक!

‘इथे’जमिनीखाली राहतात लोक!

लंडन : जगात अनोख्या ठिकाणी घरे असलेली काही गावं पाहायला मिळतात. इराणसारख्या काही देशांमध्ये डोंगरात गुहा कोरून बनवलेली घरे आढळतात. आफ्रिकेच्या ट्युनिशियामध्येही असेच अनोखे गाव आहे. तेथील दजेबेल दाहर परिसरात लोक जमिनीखाली बनवलेल्या सुसज्ज घरांमध्ये राहतात. विशेष म्हणजे ही घरे शंभरपेक्षाही अधिक वर्षांपूर्वी बनवलेली आहेत.

या भूमिगत गावाला 'तिज्मा' असे नाव आहे. ही घरे जमिनीखाली बनवलेली असली तरी त्यांच्यामध्ये आधुनिक सुख-सुविधा आहेत. येथील बहुतांश लोकांची आजूबाजूच्या परिसरात शेती आहे. त्यामुळे हे लोक आपल्या शेताजवळच राहतात. अर्थात अनेक लोक हे गाव सोडून शहरातही गेले आहेत. याठिकाणी जमिनीखाली अशी घरे बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील गरम हवा.

जमिनीखाली घरे असल्याने या घरांमध्ये गारवा राहतो. अगदी उन्हाळ्यातही अशा घरांमध्ये फारसा त्रास जाणवत नाही. या घरांसाठी जास्तीत जास्त मातीचाच वापर केला असल्याने हा गारवा टिकूनही राहतो. तसेच घरे तयार करीत असताना समोर पुरेशी मोकळी जागा राहिल व हवा खेळती राहिल याचीही काळजी घेण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news