तुम्‍ही सकाळी उशिरपर्यंत झाेपताय? जाणून घ्‍या दुष्परिणाम | पुढारी

तुम्‍ही सकाळी उशिरपर्यंत झाेपताय? जाणून घ्‍या दुष्परिणाम

नवी दिल्ली : दररोज सकाळी लवकर किंवा नियोजित वेळेवर उठणे हे आपल्यापैकी अनेकांसाठी कठीण काम असते. कितीही अलार्म लावले किंवा इतर उपाय केले तरी बरेच लोक सकाळी लवकर  जाग येणे शक्य होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे रात्रीची झोप पूर्ण होत नाही, यामागाचं मुख्य कारण असलं तरी बरेचदा प्रयत्न करूनही वेळेत जाग येत नाही. तुम्हालाही अशाच समस्येला सामारे जावे लागत असेल तर वेळीच सावध व्हा. उशिरा उठल्यामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घ्या…

चयापचय होते मंद

ज्या लोकांना सकाळी उशिरा उठण्याची सवय आहे, त्यांची चयापचय मंद होते. यामुळे लोकांना कॅलरी बर्न करण्यात अडचण येते. त्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या सुरू होते. जर तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर तुमची पचनशक्ती मंद होऊ शकते. यामुळे आम्लपित्त, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हा त्रास वाढल्यास मुळव्याध होण्याचा धोका असतो. जे लोक सकाळी उशिरा उठतात त्यांना पचनाच्या समस्या जास्त असतात.

शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते

रात्री जागे राहून सकाळी उशिरा उठल्यामुळे सकाळचा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते. त्यामुळे रक्तदाबाची पातळी आणि वाईट कोलेस्टेरॉलची पातळी (हृदयरोग) वाढते. त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तातील साखर हा देखील वाईट जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. जर तुम्ही रात्री जागे राहून सकाळी उशिरा उठला तर रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे भूकेशी संबंधित समस्या वाढू लागतात. त्यामुळे लोकांचा आहार संतुलित राहत नाही आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

Back to top button