मगरीच्या पोटातून निघाली नाणी! | पुढारी

मगरीच्या पोटातून निघाली नाणी!

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नेब्रास्कामध्ये एका मगरीच्या पोटात तब्बल 70 नाणी सापडली. ओमाहा झू अँड अक्वॅरियममधील कर्मचार्‍यांना मगरीच्या रुटीन चेकअपवेळी ही नाणी सापडली. त्याची माहिती झू कडून इन्स्टा पेजवर शेअर करण्यात आली आहे. झू कडून तीन फोटो शेअर करण्यात आले. यामध्ये मगरीच्या पोटातून काढलेली नाणीही दाखवली आहेत.

झू ने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की आमच्या पशू चिकित्सकांनी झू मधील मगरीच्या पोटातील काही धातूच्या वस्तूंचा शोध लावला. या वस्तू काय आहेत, त्या मगरीला धोकादायक ठरू शकतात का याचा विचार सुरू झाला व मगरीला त्रास होण्यापूर्वीच त्या बाहेर काढण्याचे ठरले. त्यामध्ये तिच्या पोटात अमेरिकेतील 70 नाणी आढळली.

मगरीला आधी भूल देण्यात आली व नंतर एका पाईपच्या सहाय्याने तिच्या पोटातून ही नाणी बाहेर काढण्यात आली. या पोस्टला आतापर्यंत 5 हजार लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंटस्ही केले आहेत. ही एक अल्बिनो म्हणजेच सफेद मगर आहे. मगर ज्या कृत्रिम तलावात राहते त्यामधील पाण्यात कदाचित संग्रहालय पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी नाणी फेकलेली असावीत. ही नाणीच या मगरीच्या पोटात गेली!

संबंधित बातम्या
Back to top button