‘हे’ जीव त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधीही झोपत नाहीत! | पुढारी

‘हे’ जीव त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधीही झोपत नाहीत!

लंडन : प्रत्येक जीवासाठी झोप ही अतिशय महत्त्वाची असते, मग ते माणूस असो किंवा प्राणी. माणसाला तन-मनाच्या विश्रांतीसाठी आणि आरोग्यासाठी सात ते आठ तासांची गाढ झोप गरजेची असते. मात्र, जगात असेही काही जीवही आहेत, जे त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधीच झोपत नाहीत.

फुलपाखरे त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधीही झोपत नाहीत, ते स्वतःला एकाच जागी ठेवून विश्रांती घेतात. त्यावेळी त्यांच्या शरीराचे तापमान आणि हृदयाचे ठोके कमी होतात. मुंग्या या कधीही झोपत नाहीत कारण त्यांच्या डोळ्यांवर एकही बाहुली नसते. त्यामुळे मुंग्या सतत काम करत असतात.

शार्कला ऑक्सिजनची खूप गरज असते आणि त्यामुळे तो पाण्यात सतत तरंगत असतो. शार्क कधीही झोपत नाही. डॉल्फिनला देखील भरपूर ऑक्सिजनची गरज असते, त्यामुळे ते सतत पाण्यात पोहत राहतात; पण कधीही झोपत नाही. जेलीफिशदेखील त्यांच्या आयुष्यात कधीच झोपत नाही, फक्त विश्रांतीसाठी ते त्यांचे शरीर पाण्यात सैल सोडतात.

Back to top button