इंग्लंडमध्ये आढळले मगरीसारखे दिसणारे कासव | पुढारी

इंग्लंडमध्ये आढळले मगरीसारखे दिसणारे कासव

लंडन : कोट्यवधी वर्षांपासून कासवांचे (Turtle) या भूतलावर अस्तित्व आहे. त्यांच्या प्रजातीही तीनशेपेक्षा अधिक आहेत. त्यापैकी लेदरबॅक टर्टल ही सर्वात मोठ्या आकाराची प्रजाती आहे. गोड्या पाण्यातील, खार्‍या पाण्यातील अनेक कासवं वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी लक्ष वेधून घेत असतात. त्यांचे दीर्घायुष्यही माणसाला थक्क करीत असते. आता इंग्लंडमध्ये एक अनोखे कासव सापडले आहे. एखाद्या मगरीसारखे रंगरूप असलेले हे कासव आहे.

इंग्लंडच्या कुम्ब्रियामध्ये हे अनोखे कासव (Turtle) आढळले. नॉर्थ कुम्ब्रियाच्या एका सरोवरात आढळलेले हे कासव लगेचच लोकांच्या चर्चेचा विषय बनले आणि सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात त्याला तत्काळ प्रसिद्धीही मिळाली हे सांगणे नकोच! या कासवाचे नावही ‘अ‍ॅलिगेटर स्नॅपिंग टर्टल’ असे आहे. त्याच्या मगरीसारख्या ‘लूक’मुळेच त्याला हे नाव पडले आहे. हे कासव प्रौढ वयात 50 किलो वजनाचेही होऊ शकते. सर्वसाधारणपणे अशी कासवं दक्षिण अमेरिकेत आढळतात. मात्र, आता प्रथमच ते इंग्लंडच्या एका सरोवरातही आढळल्याने चर्चेचा विषय बनलेले आहे.

Back to top button