विमानातील ‘त्या’ घराची आनंद महिंद्रांनाही भुरळ! | पुढारी

विमानातील ‘त्या’ घराची आनंद महिंद्रांनाही भुरळ!

चेन्नई : गत आठवड्यापासून चॅप या अवलियाने आपल्या विमानातील आलिशान घराची सैर घडवली, त्यावेळेपासून या घराची बरीच चर्चा रंगत आली. या आलिशान घराची आता आनंद महिंद्रा यांनाही भुरळ पडली असून, त्यांनी या घराचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

बोईंग 737 या खर्‍या विमानातील हे घर समुद्रकिनारी असलेल्या मोठ्या डोंगरावर सजवले गेले आहे. या विमानाचे इंटेरिअर आणि एक्टेरिअर खूपच लक्झरी पद्धतीने सजवले गेले आहे. त्यामुळे कोणालाही या घरात राहण्याचा मोह होईल. आलिशान बेडरूम, बाथरूम, टॉयलेट या विमानातील घरात आहे. एवढेच नाही तर एका बेडरूममध्ये सुंदर जकूझी दिलेली आहे. जिथून काचेतून निसर्गाचा आनंद लुटता येतो. ही काचेची खिडकी उघडली जाते, ज्यामुळे स्वच्छ हवेचाही आनंद लुटता येतो. अप्रतिम डायनिंग एरिया, स्विमिंगपूलदेखील या विमानाच्या घरात आहे.

विमानाच्या एका पंखावर सुंदर असा सिटिंग एरियादेखील बनवला गेला आहे. जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासह रोमँटिक वेळ घालवत समुद्राचा आनंद घेऊ शकता. या पार्श्वभूमीवर, महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर केला.

हा व्हिडीओ आपल्या ट्विटर म्हणजेच ‘एक्स’वर शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, ‘अतिशय अप्रतिम अशा विमानातील घरात राहणे कोणालाही आवडेल. येथील प्रत्येक घटकाबद्दल बरीच काळजी घेण्यात आली आहे. पण, इथे राहिल्यानंतर जेट लॅगचा त्रास जाणवणार का, याची मला काळजी वाटते!’

Back to top button