पॅसिफिक महासागराच्या तळाशी का पडत आहेत भेगा?

पॅसिफिक महासागराच्या तळाशी का पडत आहेत भेगा?

वॉशिंग्टन : पृथ्वीचा बहुतांश भाग हा पाण्यानेच व्यापलेला आहे, ज्यामध्ये सात महासागर आहेत. या महासागरांपैकी एक म्हणजे पॅसिफिक महासागर. पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. तुम्हाला माहिती आहे का की, या सर्वात मोठ्या समुद्राच्या खाली पृथ्वीवर भेगा पडू लागल्या आहेत? संशोधकांनी याची कारणे स्पष्ट करून सांगितली आहेत.

वास्तविक, आपल्या पृथ्वीचे लिथोस्फियर म्हणजेच त्याचा वरचा पृष्ठभाग अनेक प्लेटस्ने बनलेला आहे. त्याच्या वरच्या पृष्ठभागावर टेक्टोनिक प्लेटस् तयार होतात. ज्यावर महाद्वीप आणि महासागर तयार होतात. शास्त्रज्ञांनी या प्लेटस्शी संबंधित एक नवीन शोध लावला आहे. कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे.

ज्यामध्ये वैज्ञानिकांना प्रशांत महासागराच्या खाली असलेल्या प्लेटस्मध्ये मोठा दोष असल्याचे आढळून आले आहे, म्हणजेच पॅसिफिक महासागराच्या खाली पृथ्वीवर भेगा दिसल्या आहेत. या भेगा केवळ शेकडो किलोमीटर लांब नाहीत तर हजारो मीटर खोलही आहेत. या दोषांमुळे महासागर प्लेट तुटून दूर जात आहे. पृथ्वीच्या महासागरातही अशा तडे येतात याची शास्त्रज्ञांना कल्पना नव्हती. या विवरांमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. अलीकडे, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा त्यामागील कारण म्हणजे दोन प्लेट.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news