‘हे’ ठिकाण पृथ्वीवरच आहे!

‘हे’ ठिकाण पृथ्वीवरच आहे!

वॉशिंग्टन : पृथ्वीभोवती फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीची अनेक अनोखी छायाचित्रे टिपली जात असतात. अशी छायाचित्रे 'नासा'कडून वेळोवेळी सोशल मीडियातही शेअर केली जातात. काही दिवसांपूर्वी हिंदुकुश पर्वतराजीचे छायाचित्र समोर आले होते. आता असेच एक छायाचित्र 'एक्स'वर शेअर करण्यात आले आहे. हे छायाचित्र पाहिल्यावर 'नासा'ने कोणत्या ग्रहाचे छायाचित्र टिपले आहे, असे अनेकांना वाटू शकते. मात्र, हे छायाचित्र अन्य ग्रहावरील नसून ते पृथ्वीवरीलच आहे. हे छायाचित्र जगातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून ओळखल्या जाणार्‍या सहारा वाळवंटाचे आहे.

या वाळवंटाचा स्पेस स्टेशनमधून एक व्हिडीओही बनवण्यात आला आहे. त्यामध्ये तेथील वादळे, ढगांची दाटी दिसून येते. आफ्रिकेच्या उत्तर भागात असलेले सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. मोरोक्को, अल्जेरिया, इजिप्त, लिबिया, सुदान आणि ट्युनिशिया यासारखे अनेक देश या वाळवंटात किंवा त्याच्या जवळ आहेत.

बहुतांशी सहारा वाळवंट हे नापीक असून, कुठे खडकाळ, कुठे सपाट, कुठे डोंगराळ व कोरड्या दर्‍यांनी व्यापलेले आहे. उन्हाळ्यात येथील तापमान 58 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. साहजिकच, या भागातील लोकसंख्याही विरळ आहे. रात्रीच्या वेळी वाळवंटातील तापमान कमालीचे घसरते. अल्जेरियात 2005 मध्ये उणे 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, मोरोक्को आणि अल्जेरियासारख्या काही भागांत या वाळवंटामध्ये हिमवृष्टीही झालेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news