नवी दिल्ली : बर्याच वेळा एखाद्या पदार्थाचे, वस्तूचे किंवा वाहनाचेही खरे नाव बाजूला राहते आणि ते दुसर्याच नावाने ओळखू लागते. 'डालडा' हे कंपनीचे नाव आहे, त्यामध्ये जो पदार्थ असतो त्याला 'वनस्पती तूप' म्हणतात हे अनेकांना अजूनही ठाऊक नाही! असाच प्रकार 'जेसीबी'चा आहे. कुठे बांधकाम होत असेल किंवा कुठे रस्त्याचे काम सुरू असेल, तर तिथे आपल्याला वेगवेगळ्या मशिन पाहायला मिळतात; पण सगळ्यात कॉमन आणि जी कोणत्याही कामासाठी वापरण्यात येणारी मशिन म्हणजे जेसीबी. 'जेसीबी' हे या मशिनचे नाव नसून, ते कंपनीचे नाव आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मग या मशिनचे नाव काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल. या मशिनचे नाव आहे 'बॅकहो लोडर'!
पिवळ्या रंगाची असणारी ही मशिन इतकी मोठी असते की, काही क्षणात ही कोणत्याही मोठ्या इमारतीदेखील पाडू शकते. कन्स्ट्रक्शन साईटस्वरदेखील जेसीबी मशिन खोदकाम करत असल्याचे आपण पाहतो. या मशिनचा रंग पिवळा असतो. फक्त ही एकच मशिन नाही, तर याशिवाय बुलडोझर नावाचेही एक मशिन आहे. जिचा वापर हा रस्ता बनवण्यासाठी करण्यात येतो. या मशिनचा रंगदेखील पिवळा असतो. मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की अशा काही मशिन्स आहेत त्यांचा रंग पिवळा का असतो? कधी काळी या मशिन वाहनांचा रंग हादेखील लाल आणि पांढरा होता; पण काही गोष्टी लक्षात घेता यांचा रंग हा पिवळा करण्यात आला. दरम्यान, जेव्हा लाल आणि पांढर्या रंगाची जेसीबी मशिन ही कन्स्ट्रक्शन साईटस्वर काम करायची तेव्हा लांबून त्या स्पष्ट दिसायच्या नाहीत. रात्री तर पांढर्या आणि लाल रंगाच्या मशिन या दिसायच्याच नाहीत. मग कंपनीने जेसीबीचा रंग पिवळा केला, जेणेकरून लांबून त्या दिसू शकतील.
पिवळा रंगाच्या असल्याने त्या रात्रीदेखील स्पष्ट दिसू लागल्या होत्या. जेसीबी हे मशिनचे खरे नाव नाही, तर मशिन बनवणार्या कंपनीचे नाव आहे. या 'जोसेफ सिरिल बामफोर्ड एक्सावेटर्स' असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीची स्थापना ही 1945 जोसेफ सिरिल बामफोर्ड यांनी केली होती. कंपनीच्या नावाने आता या मशिनला ओळख मिळाली आहे. जेसीबी कंपनीने 1945 मध्ये पहिले 'बॅकहो लोडर' बनवले होते. त्याआधी 1953 मध्ये त्याचे एक मॉडेल बनवण्यात आले होते. मात्र, या मॉडेलमध्ये बदल करण्यात आले होते. दरम्यान, जेव्हा 1953 मध्ये जेव्हा त्याचे मॉडेल बनवण्यात आले होते. तेव्हा त्या मशिनचा रंग हा निळा आणि लाल ठेवण्यात आला होता. त्यानंतर हे रंग बदलून लाल आणि पांढरा करण्यात आला होता. सगळ्यात शेवटी सुरक्षा पाहता या मशिनचा रंग पिवळा करण्यात आला होता.