‘तिने’ 7 दिवसांमध्ये केली 155 कोटींची कमाई

‘तिने’ 7 दिवसांमध्ये केली 155 कोटींची कमाई

बीजिंग : सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग समोर आलेले आहेत. कुणी यूट्यूबवर व्हिडीओ बनवून पैसे कमावतो, तर कुणी ऑनलाईन वस्तू विक्री करून कमाई करतो. एक तरुणी अशीच ऑनलाईन वस्तुंची विक्री करण्याचे काम करते. मात्र तिची वस्तुंचे प्रदर्शन व विक्री करण्याची पद्धत अशी आहे की, त्याचा प्रभाव अनेकांवर पडतो. या तरुणीने असे करून केवळ सात दिवसांमध्येच 155 कोटी रुपयांची कमाई केली आहे!

'एक्स' म्हणजेच ट्विटरवर नुकताच याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, जो आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी दिसत आहे, जी ऑनलाईन वस्तू विकण्याचे काम करीत आहे. ती एक सोशल मीडिया इंफ्लुएन्सर आहे आणि लाईव्ह स्ट्रीमरही आहे. ती लाईव्ह स्ट्रीम करून या माध्यमातून ऑनलाईन वस्तू विकते. ही तरुणी सर्व वस्तू ग्राहकांना केवळ तीन सेकंदांसाठी दाखवते आणि लगेचच दुसरी वस्तू दाखवते. ती या वस्तू इतक्या वेगाने दाखवते की, अनेक लोक त्या नीट पाहू शकतही नाहीत.

एका वृत्तानुसार या तरुणीचे नाव 'झेंग झियांग झियांग' असे आहे. ती एक चिनी लाईव्ह स्ट्रीमर आहे. तिने आपल्या या अजब पद्धतीमधून सात दिवसांमध्ये तब्बल 155 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता 'एक्स'वर तिच्या या व्हिडीओलाही एक कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका कमेंटनुसार ही तरुणी 2017 पासून लाईव्ह स्ट्रीमच्या बिझनेसमध्ये आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news