सरड्याप्रमाणे वेगाने रंग बदलणारा मासा | पुढारी

सरड्याप्रमाणे वेगाने रंग बदलणारा मासा

नवी दिल्ली : निसर्गात रंग बदलणारे अनेक जीव आहेत. त्यामध्ये सरड्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. विशेषतः शॅमेलिऑन प्रजातीचे सरडे अत्यंत वेगाने शरीराचा रंग बदलत असतात. आता अशाच प्रकारे वेगाने रंग बदलू शकणार्‍या माशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या माशाला ‘टाईलफिश’ किंवा ‘फ्लॅशिंग टाईलफिश’ म्हणतात. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, टँकमधील पाण्यात पोहणारा एक मासा एका क्षणात कसा रंग बदलत आहे. पोहता पोहता तो कधी निळा, कधी नारंगी, कधी पिवळा तर कधी राखाडी रंग घेत असल्याचे दिसत आहे. या अनोख्या माशाचा व्हिडीओ एका एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले की, ‘या माशाच्या त्वचेतील विशेष प्रथिनांच्या मदतीने तो रंग बदलत आहे. या व्हिडीओवर युजर्स भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, असा मासा असतो हे मला आधी माहीतच नव्हते. दुसर्‍या यूजरने लिहिले की, समुद्रात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही. तिसर्‍या युजरने लिहिले की, ‘गिरगिट’ (सरडा) मासा आहे का?

Back to top button