अनेक पोषक घटकांचा खजिना असते तुती! | पुढारी

अनेक पोषक घटकांचा खजिना असते तुती!

नवी दिल्ली : आपल्या देशात फळांच्या अनेक प्रजाती आढळतात. आंबा, सफरचंद, संत्री, लिची, केळी, पेरू अशी अनेक फळे बाजारात उपलब्ध आहेत. पण असे एक फळ आहे, जे खायला खूप चवदार असते व त्याचबरोबर अनेक पोषक तत्त्वांनी समृद्धही आहे. या फळाचे नाव आहे ‘तुती’ किंवा ‘मोरस अल्बा’.

तुती फळ कच्चे असताना हिरवे, लाल आणि पिकल्यावर जांभळे दिसते. हे फळ दिसायला जेवढे सुंदर आहे, तेवढेच आरोग्यदायी आहे. या फळामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चवीला आंबट, गोड तुती उष्माघातापासून बचाव करते. तुतीमध्ये पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. यात 77 टक्के पाणी आणि 60 कॅलरीज् असतात. याशिवाय यात 88.60 टक्के कार्बन, 9.6 टक्के फायबर, 1.7 टक्के प्रोटीन आणि 1.4 टक्के फॅट असते.

यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, व्हिटॅमिन के , पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आढळते, जे आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. व्हिटॅमिन ए, सी आणि ई सोबत लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमदेखील मोठ्या प्रमाणात आढळतात. तुतीचा एक गुण म्हणजे पचनक्रिया सुधारणे. ज्या लोकांना गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन यासारख्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरते. हे पचनसंस्थेतील जळजळदेखील कमी करते.

या फळामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि इतर लक्षणे दिसत नाहीत. तुती डोळ्यांसाठी औषधाचे काम करतात. जे लोक डोळ्यांच्या कमकुवतपणामुळे त्रस्त आहेत. त्यांची द़ृष्टी सुधारण्यास मदत करतात. तुतीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. शरीरात संसर्गाविरूद्ध प्रतिपिंड तयार करते. एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या त्वचेच्या रोगांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. आतड्याच्या कर्करोगातही हे फायदेशीर आहे.

Back to top button