व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड लाभदायक | पुढारी

व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड लाभदायक

नवी दिल्ली : रोजच्या नाश्त्यात अनेक लोक व्हाईट ब्रेडचा वापर करीत असतात. मात्र, असा ब्रेड सातत्याने खाणे हे लठ्ठपणाला निमंत्रण देणारे ठरू शकते. याउलट ब्राऊन ब्रेडचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. ब्राऊन ब्रेड पूर्णपणे गव्हापासून बनवला जातो. तो जास्त प्रक्रियेतून जात नाही, म्हणूनच त्यामध्ये भरपूर पोषणही असते, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ब्राऊन ब्रेडमध्ये जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम, झिंक, फायबर यासारखी अनेक खनिजे असतात. हा ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल वाढत नाही. ब्राऊन ब्रेडमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते. ब्राऊन ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेटस् भरलेले असतात, जे शरीराला ऊर्जा देतात.

याशिवाय, कार्ब्स शरीराच्या अनेक कार्यांमध्ये मदत करतात. याव्यतिरिक्त, ब्राऊन ब्रेडमध्ये फॉलिक अ‍ॅसिड, झिंक, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि बी 6 सारख्या अनेक पोषक तत्त्वांचा समावेश असतो, जे आपल्या शरीराला पोषण देण्यास मदत करतात.

Back to top button