कोबीची भाजी आरोग्यासाठी गुणकारी | पुढारी

कोबीची भाजी आरोग्यासाठी गुणकारी

नवी दिल्ली : कोबी ही अतिशय लोकप्रिय भाजी आहेच; पण काही लोकांना कोबी खायला आवडत नाही. अर्थात कोबी पोषणाच्या बाबतीत मुळीच कमी नाही. कोबीचे सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवण्याला मदत करते.

हिवाळी बाजार म्हणजे ताज्या भाज्या आणि फळे. त्यापैकी बहुतेक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. भाज्या अनेक आजार कमी करण्यास मदत करतात. यापैकी एक म्हणजे सर्वांना माहीत असलेली भाजी म्हणजे पत्ता कोबी आहे. ही भाजी फक्त हिवाळ्यातच नाही तर सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असते. कोबी क्रूसिफेरस भाज्यांपैकी एक आहे. तसेच ब्राेकोली आणि फुलकोबी देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. या दोन भाज्यांच्या सेवनामुळे अनेक आजार बरे होतात.

कर्करोग टाळण्यास मदत करते, सल्फर समृद्ध कम्पाऊंड असल्यामुळे कोबी थोडीशी कडवट आहे; पण ती कडू असली तरी कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करते. कोबीमधील सल्फोराफेन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते. मेंदूची कार्यक्षमता राखते. कोबीमध्ये व्हिटॅमिन के, आयोडिन आणि अँथोसायनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात. हे घटक मेंदूच्या पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करतात. अल्झायमरच्या रुग्णांसाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते. या भाजीच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कोबीमध्ये इतर पोषक तत्त्वांसह पोटॅशियम देखील असते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच जळजळ कमी करते. क्रूसिफेरस भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. कोबीसुद्धा त्याला अपवाद नाही. कोबीमध्ये सल्फोराफेन, केम्पफेरॉल आणि अनेक अँटिऑक्सिडंट असतात. ते जळजळ कमी करण्यास मदत करतात.

Back to top button