'या' राज्यात होते बाजरीचे सर्वाधिक उत्पादन | पुढारी

'या' राज्यात होते बाजरीचे सर्वाधिक उत्पादन

नवी दिल्ली : भारताच्या प्रयत्नांमुळेच ‘मिलेटस्’ म्हणजेच भरड किंवा तृणधान्यांबाबत जगभरात नवी जागृती झाली. या भरड धान्यांमध्ये बाजरीचाही समावेश होतो. आपल्याकडे विशेषतः भोगीच्या सणाला घरोघरी बाजरीची भाकरी केली जाते. बाजरीच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाल्यास, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत राजस्थान आघाडीवर आहे. बाजरीच्या लागवडीसाठी येथील हवामान आणि माती खूपच चांगली आहे. त्यामुळे बाजरीचे सर्वाधिक उत्पादन राजस्थानमध्ये होते. कृषी राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण बाजरीचे 28.6 टक्के उत्पादन एकट्या राजस्थानमध्ये होते.

गव्हाच्या पिठाच्या रोट्या आपल्या सर्वांच्या घरांमध्ये बनवल्या जातात. परंतु, असे बरेच लोक आहेत ज्यांना बाजरीच्या पिठाच्या रोट्या खायला आवडतात. बाजरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. म्हणूनच डॉक्टरही आरोग्यदायी आहारात बाजरी वापरण्याचा सल्ला देतात. तसेच, बाजरीची किंमत जास्त नाही, म्हणून आपण ते सहजपणे वापरू शकता. बहुतेक घरांमध्ये लोक बाजरी वेगवेगळ्या प्रकारे वापरतात.

बाजरीची खिचडी, रोटी, चीला किंवा हलवाही बनवला जातो. बाजरी हे असे भरड धान्य आहे जे फक्त 60 ते 100 दिवसांच्या कालावधीत पिकते. कोरड्या भागातही हे पीक सहज घेता येते. मोती बाजरी सूक्ष्म पोषक आणि अत्यावश्यक अमीनो अ‍ॅसिडने समृद्ध आहे. त्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे आढळून आल्याने ते जनावरांसाठी चारा म्हणूनही बाजरीचा वापर केला जातो.

संबंधित बातम्या
Back to top button