मंगळाच्या विषुववृत्तावर जमिनीखाली बर्फाचा स्तर | पुढारी

मंगळाच्या विषुववृत्तावर जमिनीखाली बर्फाचा स्तर

लंडन : युरोपियन स्पेस एजन्सीच्या संशोधकांनी मंगळभूमीवर दडलेल्या पाण्याच्या बर्फाच्या जाड स्तराला शोधून काढले आहे. मंगळाच्या विषुववृत्तावर जमिनीखाली पाण्याच्या बर्फाचा तब्बल दोन मैल जाडीचा स्तर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या मार्स एक्स्प्रेस मिशनमध्ये हे संशोधन करण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून हे यान मंगळाभोवती फिरत वेगवेगळी वैज्ञानिक निरीक्षणे नोंदवत आहे. अर्थात मंगळाच्या विषुववृत्ताच्या भागात पाण्याच्या बर्फाचा छडा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, या नव्या संशोधनामुळे आधीच्या शोधांची पुष्टीच झाली आहे.

अमेरिकेच्या स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमधील थॉमस वॉटर्स यांनी सांगितले की रडार सिग्नल्सनी अपेक्षितच शोध लावलेला आहे. तसेच मंगळाच्या ध्रुवीय भागातून जी निरीक्षणे नोंदवली होती त्यांचीही पुष्टी झाली आहे. हा बर्फाचा साठा अतिशय मोठा आहे. तो जमिनीत 2.3 मैल जाडीचा स्तर आहे. त्याच्यावर शेकडो मीटर जाडीची कडक राख आणि कोरड्या धुळीचा स्तर आहे. अर्थातच जमिनीतील हा बर्फ शुद्ध स्वरूपाचा नसून त्यामध्ये धुळ मिसळलेली आहे. पंधरा वर्षांपूर्वीच तेथील जमिनीत बर्फाचा साठा असल्याचे सर्वप्रथम निष्पन्न झाले होते.

Back to top button