केवळ एकच प्रश्न विचारून ‘ती’ कमावते कोट्यवधी रुपये!

केवळ एकच प्रश्न विचारून ‘ती’ कमावते कोट्यवधी रुपये!
Published on
Updated on

लंडन : आयुष्यात सगळेजण पैसा कमवण्यासाठी अथक परिश्रम घेत असतात. अनेकजण श्रमजीवी असतात. तर, काही बुद्धिजीवी असतात. पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र, आपल्या कुवतीप्रमाणे योग्य मार्ग निवडता आला पाहिजे. एका महिलेने आपल्या हुशारीने एका वर्षात कोट्यवधीची कमाई केली आहे. ब्रिटनमध्ये राहणार्‍या या महिलेने लोकांना फक्त एक प्रश्न विचारून वर्षभरात 8 कोटी रुपये कमावले आहेत. ही महिला सध्या चांगलीच चर्चेत आहे.

हॅना विल्यम्स असे या महिलेचे नाव आहे. 27 वर्षीय हॅना ब्रिटनची रहिवासी आहे. डेली मेलने हॅनाच्या कमाईबाबत एक स्पेशल रिपोर्ट बनवला. हॅना आणि तिचा पती डॅनियल हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून अनेकजण पैसे कमावतात अशी माहिती या दोघांना मिळाली. त्यांनी देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून कमाई करण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी या जोडप्याने अतिशय हटके आयडिया शोधून काढली आणि त्यांची ही आयडिया सुपरहिट ठरली. हॅना आणि तिच्या पतीचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. या अकाऊंटवरून हे दोघे व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळतात. पेड प्रमोशन तसेच जाहिरातींच्या माध्यमातून ते कोट्यवधींची कमाई करतात. हॅना आणि तिचा पती सोशल मीडियावर लोकांना फक्त एक प्रश्न विचारून कोट्यवधी रुपये कमावतात. हॅना रस्त्यावर आपल्या जवळून जाणार्‍या लोकांना एकच प्रश्न विचारते 'तुम्ही किती कमावता?'. मग हॅना आणि तिचा पती लोकांनी दिलेली उत्तरे रेकॉर्ड करतात आणि त्यांच्या कामाबद्दल कॅमेरासमोर माहिती देतात.

त्याचा व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करतात. या व्हिडीओच्या माध्यमातून हॅनाने एका वर्षात 8 कोटींची कमाई केली. एका वर्षात सुमारे 10 लाख 43 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 कोटी 67 लाख रुपये कमावले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर आपल्या कमाईचा खुलासा केला आहे. व्हिडीओ क्रिएटर होण्याआधी हॅना एका कंपनीत डेटा अ‍ॅनॅलिस्ट म्हणून काम करत होती. 94 लाखांचा जॉब सोडून तिने व्हिडीओ क्रिएटर बनण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये तिने नोकरी सोडून वेगळा मार्ग निवडला आणि तिला त्यात यश देखील मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news