बर्फाळ प्रदेशात स्नान करणेही दुरापास्त! | पुढारी

बर्फाळ प्रदेशात स्नान करणेही दुरापास्त!

याकुत्स्क-सायबेरिया : जगातील सर्वात थंड ठिकाणी स्नान कसे करतील, हा प्रश्न अर्थातच सतावणारा ठरू शकतो. याचे कारण असे की, आपल्याकडे थंडी पडल्यानंतर आपल्याला पाण्यात हातही घालावासा वाटत नाही. पण, जगात काही ठिकाणे असेही आहेत, जिथे सर्वसाधारण तापमानच उणे 70 ते उणे 72 इतके असते आणि यामुळे, तेथे स्नान करणे देखील अक्षरश: अंगावर काटे आणणारे असते.

बर्फाळ प्रदेशातील नागरिक स्नान कसे करतात, यावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार, सायबेरियातील याकुत्स्क गाव जगातील सर्वात थंड गाव आहे. येथील तापमान -71 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. इथले लोक स्नान कसे करतात, याचा व्हिडीओ एनएसएच वंडर्स या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती साठवलेले लाकूड कापून पेटवते आणि ही आग चांगली पेटायला सुरू होते, त्यावेळी ती व्यक्ती बर्फ गोळा करते. आता हा बर्फ स्नानासाठी असतो. पाणी साचत असल्याने आणि ते सत्वर बर्फाळ होत असल्याने या ठिकाणी पाईपलाईन देखील निरुपयोगी ठरते. बाथ हाऊसच्या आत तापमान 100 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. ते बरेच गरम असते. पण, या सार्‍या प्रक्रियेला 5 तास लागतात आणि यामुळेच अशा बर्फाळ प्रदेशात राहणारे नागरिक आठवड्यातून एकदाच स्नान करू शकतात, असे या व्हिडीओत म्हटले गेले आहे.

Back to top button