उणे 30 अंश तापमानात ओले केस घेऊन गेली बाहेर आणि… | पुढारी

उणे 30 अंश तापमानात ओले केस घेऊन गेली बाहेर आणि...

लंडन : उत्तर गोलार्धात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. रशिया, चीन व युरोप-अमेरिकेत पारा चांगलाच घसरला आहे. अनेक देशांमधील थंडीचा कहर दर्शवणारे फोटो व व्हिडीओही समोर येत आहेत. आता स्विडनमधील सोशल मीडिया इंफ्ल्युएंसर एल्विरा लुंडग्रेन हीने आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. उणे 30 अंश सेल्सिअस तापमान असताना ही महिला ओले केस घेऊन घराबाहेर गेली आणि क्षणार्धात तिचे हे केसही गोठले!

या व्हिडीओत दिसते की, एल्विराच्या चारही बाजूला बर्फच बर्फ आहे. एल्विराने आपल्या ओल्या केसांना मागे टाकण्याचा प्रयत्न करते. पण, ते गोठलेले असतात. ती वारंवार प्रयत्न करते; पण एखाद्या लाकडाच्या कलाकृतीप्रमाणे हे केस ताठ झालेले असतात. डोक्यावर हे केस हॅटसारखे उभे करण्याचाही ती प्रयत्न करते. एल्विराने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

त्याच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे. तापमान उणे 30 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे आणि मला एक प्रयोग करायचा होता. हा व्हिडीओ उत्तर स्विडनचा आहे. बुधवारी स्विडनमधील तापमान उणे 43 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. 1999 नंतर प्रथमच तिचे तापमानाची इतकी नीचांकी नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या
Back to top button