सिंहापेक्षा खतरनाक, रागीट बुली डॉग्ज! | पुढारी

सिंहापेक्षा खतरनाक, रागीट बुली डॉग्ज!

नवी दिल्ली : घरातील पाळीव कुत्र्यावर कित्येकांचे अगदी जीवापाड प्रेम असते. घरातील पाळीव कुत्रा हा या सर्वांसाठी जणू कुटुंबातील एक सदस्यच बनलेला असतो. पण पृथ्वीतलावर एक श्वान असाही आहे, जो सिंहापेक्षाही खतरनाक तर आहेच; पण त्याचबरोबर प्रचंड रागीट देखील आहे.

या भयानकतेमुळे या श्वानाला यमराजाचे दुसरे रूप म्हणूनही ओळखले जाते. या श्वानाने हल्ला केला तर अक्षरश: अंगातील हाडांचीही पावडर होईल, इतका तो हिंस्त्र असल्याचे मानले जाते. पिटबुलसारखे दिसणारे हे श्वान बुली डॉग्ज असून क्रॉस ब्रिडिंगमध्ये या कुत्र्याची जमात तयार झाली आहे.

या श्वानांची उत्पत्ती वेगवेगळ्या 5 जातींच्या कुत्र्यांच्या संकरित प्रजननानंतर झाली असल्याचाही प्रवाह आहे. हा मुळात शिकारी कुत्रा आहे आणि त्याची आकलनाची क्षमता लक्षवेधी आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले नाही तर ते सिंहासारखे धोकादायक ठरू शकतात. त्यांच्या चाव्यामुळे त्वचा आणि मांस फाटू शकते आणि हाडांची पावडरही होऊ शकते. त्यांच्या हल्ल्यातून बचावणे जवळपास अशक्य असते.

संबंधित बातम्या

या कुत्र्यांच्या राग अत्यंत धोकादायक आहे. अमेरिकन बुली डॉग्जचे स्टँडर्ड, पॉकेट, एक्सएल आणि क्लासिक असे 4 प्रकार आहेत. यापैकी सर्वात धोकादायक एक्सएल आकाराचे कुत्रे आहेत, जे 19 ते 23 इंच आहेत. क्लासिक कुत्र्यांचा आकार समान आहे. सर्वात लहान पॉकेट आकाराचे कुत्रे फक्त 13 ते 16 इंच उंच आहेत. मात्र, त्यांची उपद्रवक्षमता मात्र निश्चितच चिंताजनक आहे.

Back to top button