अंतराळातून टिपला तुटणार्‍या तार्‍याचा व्हिडीओ!

अंतराळातून टिपला तुटणार्‍या तार्‍याचा व्हिडीओ!

वॉशिंग्टन : युरोपियन अंतराळ एजन्सीने (ईएसए) इन्स्टाग्रामवर तुटणार्‍या तार्‍याचा एक व्हिडीओ व त्याची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. एरवी आपण जवळपास प्रत्येकाने तारे तुटताना पाहिलेले असतात. पण, अंतराळातून हा नजारा कसा दिसतो, हे या व्हिडीओवरून अधोरेखित होते आहे.

तसे पाहता, विज्ञानाने एकेक पाऊल पुढे टाकताना आपल्याला पृथ्वीतलावरील अनेक रहस्यांचा उलगडा होत आला आहे. एकवेळ अशीही होती की, ज्यावेळी पृथ्वीला आपण भूभाग स्वरूपातूनच पाहू शकत होतो. पण, नंतर अशी प्रगती झाली की, पृथ्वी अंतराळातून कशी दिसते, हेदेखील उमजू लागले. याचप्रमाणे पूर्वी ज्याप्रकारे तारे तुटताना पाहणे केवळ पृथ्वीवरूनच शक्य होते, ते आता अंतराळातूनही शक्य होते आहे, ही बदलत्या तंत्राची कमाल आहे.

या पार्श्वभूमीवर, अंतराळातून चित्रित केलेला एक व्हिडीओ विशेष लक्षवेधी ठरत आहे. युरोपियन अंतराळ एजन्सीने इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तारा तुटत असताना नेमका कसा दिसतो, हे अगदी सुस्पष्ट होते आहे. आजवर कधीच पाहिला नसेल असा नजारा चित्रबद्ध झाला आहे.

अंतराळ एजन्सीने आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, सुपरनोव्हा अवशेष कॅसिओपिया एचे नियर इन्फ्रारेड व्ह्यू इन वेवलेंथवर पोहोचण्यापूर्वी जोरदार विस्फोट दिसून येतो आहे. या हाय रिझोल्युशन लूकमध्ये विस्फोटापूर्वी गॅस शेड मटेरियल्समधून खुललेल्या शेल्स डिटेल्सदेखील स्पष्टपणे दिसून येतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news