विदेशी राज परिवाराचे सहा नियम! | पुढारी

विदेशी राज परिवाराचे सहा नियम!

लंडन : भारतात राजेरजवाड्यांचे साम्राज्य यापूर्वीच खालसा झाले आहे; पण पृथ्वीतलावर काही देश असेही आहेत, जेथे आजही राज परिवाराचीच सत्ता चालते. आता शाही परिवाराचे सदस्य असणे केव्हाही सन्मानाचे, सौभाग्याचेच. पण, यानंतरही या राज परिवाराला जे नियम पाळावे लागतात, त्या नियमांचा सर्वसामान्य नागरिक स्वप्नातही विचार करू शकणार नाहीत. या पार्श्वभूमीवर पाहूयात, असे कोणते नियम आहेत, जे विदेशी परिवारातील प्रत्येक अन् प्रत्येक सदस्याला पाळावे लागतात.

यातील पहिला नियम म्हणजे राज परिवारातील सदस्य अन्य कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला अगदी स्पर्शदेखील करू शकत नाहीत. दुसरा नियम असा की, सुरक्षेच्या कारणास्तव राज परिवारातील दोन व्यक्ती कधीही, कुठेही एकत्रित अजिबात जाऊ शकत नाहीत, प्रवास करू शकत नाहीत. राज परिवारातील कोणताही सदस्य आपण टोपण नाव ठेवू शकत नाही, हा यातील तिसरा नियम.

याशिवाय, चौथा नियम म्हणजे राज परिवारातील सदस्य शेल फिश खाऊ शकत नाहीत. कारण, याला सर्वात धोकादायक आहार असे संबोधले जाते. पाचवा नियम असा की, विदेश प्रवासात असताना राजघराण्यातील सदस्यांना फक्त काळ्या रंगातील पोषाखच परिधान करावे लागतात. यानंतर सहावा व शेवटचा नियम असा की, राजघराण्यातील सदस्यांना राजकारणापासून दूर राहावे लागते. नि:पक्षपातीपणाचे पालन करणे आवश्यक असल्याने हा नियम या सदस्यांना कटाक्षाने पाळावा लागतो.

Back to top button