टोकियो : जगभरात अनेक अनोखी बेटं आहेत व त्यांची स्वतःची वैशिष्ट्येही आहेत. जपानच्या ओकिनोशिमा नावाचे बेटही अशाच वैशिष्ट्यासाठी ओळखले जाते. याठिकाणी शिंतो धर्माच्या काही जुन्या परंपरा आजही पाळल्या जातात. त्यानुसार या बेटावर महिलांना येण्यास बंदी आहे. तसेच इथे येणार्या पुरुषांनाही अनेक कडक नियमांचे पालन करावे लागते.
ओकिनोशिमा बेटाला युनेस्कोने जागतिक वारशांच्या यादीत स्थान दिले आहे. 700 चौरस मीटर जागेत फैलावलेल्या या बेटाबाबत असे म्हटले जाते की ते चौथ्या ते नवव्या शतकापर्यंत कोरियन प्रायद्विप आणि चीन यांच्यामधील व्यापाराचे एक केंद्र होते. या बेटावर वर्षातून केवळ 200 पुरुषांनाच येण्याची परवानगी आहे. जे लोक या बेटावर जातात त्यांना ताकीद दिली जाते की, त्यांनी तेथून कोणतीच वस्तू आणू नये. तसेच इथे जात असल्याचेही कुणाला सांगू नये. या बेटावर मुनाकाता ताइशा ओकित्सु मंदिर आहे. समुद्राच्या देवीचे हे मंदिर आहे. प्राचीन काळी समुद्रातून प्रवास करणार्या जहाजांच्या सुरक्षेसाठी इथे पूजा केली जात असे.