वांगे-बटाट्याची भाजी सर्वात वाईट?

वांगे-बटाट्याची भाजी सर्वात वाईट?

नवी दिल्ली : आपल्याकडे 'अन्न हे पूर्णब्रह्म' असे मानून त्याची निंदा केली जात नाही. 'अन्नं न निंद्यात' असे तैत्तरीय उपनिषदातही म्हटलेले आहे; मात्र आधुनिक काळात 'जगातील सर्वात चांगले किंवा लोकप्रिय पदार्थ' अशा याद्या केल्या जातात, तशाच 'सर्वात वाईट पदार्थ' अशाही याद्या बनवल्या जातात. नुकतीच 'टेस्टअटलास'ने जगभरातील सर्वात वाईट किंवा नावडत्या पदार्थांची यादी जाहीर केली आहे. त्यामधील शंभर 'बॅड रेटेड' पदार्थांमध्ये भारतातील बटाटा-वांगे' मिक्स' भाजीला स्थान मिळाले आहे!

खरे तर बटाटा आणि वांग्याची ही भाजी आपल्याकडे अनेकांना आवडते. काहींच्या बाबतीत ही भाजी अगदीच आवडती वगैरे नसली तरी त्यांची नावडतीही नसते; मात्र तरीही या भाजीला संबंधित यादीत स्थान मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. 'टेस्टअटलास' या ऑनलाईन फूड डिलिव्हरी पोर्टलद्वारे जगातील सर्वात नावडत्या शंभर पदार्थांची ही यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये संपूर्ण भारतभर खाल्ल्या जाणार्‍या 'आलू-बैंगन' म्हणजेच 'वांगे-बटाटा' भाजीला 60 वा क्रमांक मिळालेला आहे. या भाजीला पाचपैकी 2.7 रेटिंग्ज मिळाल्या. त्यामुळे खरे तर अनेकांची निराशाच झाली आहे!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news