स्वाझिलँडचा राजा 15 बायकांचा दादला; ‘अशी’ करायचा बायकांची निवड | पुढारी

स्वाझिलँडचा राजा 15 बायकांचा दादला; 'अशी' करायचा बायकांची निवड

नैरोबी : राजे-रजवाडे, त्यांचे विलासी जीवन, अनेक राण्या, अंतःपूर किंवा जनानाखाना याविषयी इतिहासात आपण अनेक वेळा वाचलेले असते. जगात अनेक देशांमध्ये राजेशाही संपल्यावर लोकशाही आली आणि अनेक परंपरा आणि प्रथा बंद झाल्या; पण या जगात अजूनही असा एक देश आहे जिथे राजेशाही थाट, राजवट कायम आहे. हा देश आहे आफ्रिकेतील ‘शाद किंगडम ऑफ इस्वाटिनी’. पूर्वी या देशाला स्वाझिलँड म्हणून ओळखलं जायचं. या देशाच्या राजाला पंधरा बायका आहेत!

येथील राजा मस्वाती तृतीयने त्याच्या राज्यातील लोकांना फर्मान काढला होता की, राज्यातील कोणत्याही पुरुषाकडे पाचपेक्षा कमी पत्नी असतील तर त्यांना तुरुंगाची शिक्षा होईल; पण नंतर राजानं हे खोटं असल्याचं सांगितलं. खरं तर राजा मस्वाती तृतीयने स्वतःच 15 लग्ने केली आहेत. त्याला सध्या 14 बायका आहे. कारण त्याच्या एका पत्नीचं निधन झालं आहे; पण या राजाने बायकांची निवड कशी केली, हे जाणू तुम्हाला धक्काच बसेल. या देशात दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान लुडझिजिनी नावाच्या गावात उमलंगा सेरेमनी नावाचा उत्सव भरत असतो. या उत्सवात देशातील 10 हजारांहून अधिक अविवाहित मुली सहभागी होत असतात. या तरुणी राजासमोर नृत्य करत परेड करतात. या तरुणींपैकी एक तरुणीची तो राजा राणी म्हणून निवड करतो. गेल्या काही वर्षांपासून विचित्र प्रथा म्हणजे उत्सवाला विरोध करत आहेत. 2019 मध्ये अनेक कुटुंबांनी आणि तरुणींनी या उत्सवात सहभाग होण्यास नकार दिला होता. जेव्हा ही गोष्ट राजाला कळली तेव्हा राजाने त्या तरुणींच्या कुटुंबीयांना मोठा दंड ठोठावला होता.

Back to top button