सोन्या-चांदीपेक्षाही महागडी आहे ‘ती’ धूळ! | पुढारी

सोन्या-चांदीपेक्षाही महागडी आहे ‘ती’ धूळ!

कॅलिफोर्निया : धूळ ही महत्त्वाची वा महागडी असू शकेल काय, असा प्रश्न आजवर कधी मनात आलाही नसेल. सर्व मेहनत धुळीला मिळाली, असे सहजपणे म्हटले जाते. त्यावेळी कळत-नकळत या धुळीची किंमत मातीमोलपेक्षाही कमी असते, हेच अधोरेखित होते; पण एकप्रकारची धूळ अशीही आहे, जी चिमूटभर असून, चक्क कोट्यवधीला विकली जाते.

तसे पाहता, धूळ ही नेहमीच काहीही किंमत नसलेली गोष्ट मानली जाते. धूळ नेहमीच निरुपयोगी आणि निर्जीव असते, असे नाही. कधी कधी धुळीची किंमत कोट्यवधीमध्येही जाते; पण यासाठी ती धूळ कुठून आली आहे, हे फार महत्त्वाचे असते. आता जगातील सर्वात महागडी धूळ ही पृथ्वीवरून आलेली नाही, तर तिच्या उपग्रह चंद्रावरून आली आहे.

जेव्हा या धुळीचा लिलाव झाला, तेव्हा चिमूटभर धूळ विकत घेण्यासाठी लोक 4 कोटी 16 लाख 71 हजार 400 रुपये मोजण्यास तयार होते. पृथ्वीवर विकली जाणारी सर्वात महाग धूळ चंद्रावरून आणली गेली. त्यामुळेच ही धूळ दुर्मीळ झाली आहे. अपोलो 11 चंद्र मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आलेल्या बोनहॅम्स येथे त्याचा लिलाव करण्यात आला आहे. एप्रिल 2022 मध्ये 50 लाख डॉलर म्हणजेच 4 कोटी 16 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला तिचा लिलाव झाला. ही धूळ खरेदी करणार्‍याचे नाव माहीत नाही; मात्र चिमूटभर धुळीसाठीची ही बोली इतिहासात नोंदली गेली आहे.

ही धूळ अपोलो 11 मोहिमेदरम्यान अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगने आणली होती. लिलावादरम्यान, तिची किंमत 4 लाख डॉलरपर्यंत होती. परंतु, प्रीमियम, शुल्क इत्यादींसह एकूण किंमत 50 लाख डॉलरपेक्षा जास्त झाली. जगातील फक्त तीन देशांकडे चंद्राची धूळ आहे – अमेरिका, रशिया आणि चीन. अमेरिकेकडे चंद्रावरील खडकाचे नमुनेदेखील आहेत, तर रशिया आणि चीनकडे फक्त चंद्राची धूळ आहे आणि म्हणूनच याचा सर्वात महागडी धूळ म्हणून विशेष उल्लेख होतो.

Back to top button