ऑस्ट्रेलियात प्राचीन मानवी वसाहतीच्या अवशेषांचा शोध

ऑस्ट्रेलियात प्राचीन मानवी वसाहतीच्या अवशेषांचा शोध

कॅनबेरा : वैज्ञानिकांनी एक असे ठिकाण शोधले आहे जिथे एकेकाळी ऑस्ट्रेलियाच्या तटापासून दूरवर हजारो लोक राहत होते. क्वाटरनेरी सायन्स रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित संशोधनानुसार साहुलच्या वायव्य शेल्फवर मानवी वसाहतीचे तसेच त्या काळातील कलाकृतींचे अवशेष सापडले आहेत. किम्बर्लीच्या उत्तर क्षेत्रातील तटावर न्यू गिनीशी जोडलेल्या जमिनीच्या तुकड्याजवळ हे ठिकाण आहे. प्राचीन काळात याठिकाणी मानवी वसाहत होती व तिथे मोठ्या संख्येने लोक राहत होते असे संशोधकांनी म्हटले आहे.

या जमिनीच्या तुकड्यावर एके काळी एक शानदार इको सिस्टीम होती जी 2.5 दशलक्ष वर्षांपूर्वी प्लेइस्कोसिन काळाच्या अखेरीस अस्तित्वात होती. हा जलमग्न भूभाग 2,50,000 चौरस मैलाच्या क्षेत्रात फैलावलेला आहे, जो ब्रिटनपेक्षा 1.6 पट मोठा होता. या महाद्विपीय शेल्फला एकेकाळी वाळवंट मानले जात असे. मात्र तो नद्या, झरे आणि एका मोठ्या भूमध्य समुद्रकिनार्‍याने संपन्न होता. तिथे 50 हजार ते पाच लाख लोक राहत होते.

एकेकाळी या शेल्फने ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्या सेतूसारखेही काम केले असावे. हजारो वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे ठिकाण पाण्याखाली गेले. शेल्फचा सुमारे निम्मा भाग 12 हजार ते 9 हजार वर्षांपूर्वी बुडाला. समुद्राच्या वेगाने वाढत असलेल्या जलस्तराच्या काळापैकी हा पहिला टप्पा होता.

ऑस्ट्रेलियाच्या निर्मितीवेळेच्या भूभागावर होती वसाहत

ऑस्ट्रेलिया पृथ्वीवरील सर्वात छोटा खंड आणि सर्वात मोठे बेट आहे. ते एके काळी एकाच अखंड महाद्विपाचा भाग होते, ज्याला 'गोंडवाना' असे म्हटले जाते. भारतीय उपखंडही याच महाद्विपाचा एक भाग होता. काळाच्या ओघात हा महाखंड फुटला व त्यापासून अनेक खंड निर्माण झाले. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया खंडही बनला होता. ऑस्ट्रेलियाच्या निर्मितीच्या प्रक्रियेवेळी काही भूभाग असेही होते जे कालांतराने समुद्राची पातळी वाढल्याने पाण्याखाली गेले. अशाच एका भागावर हजारो वर्षांपूर्वी मानवी वसाहत होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news