विमानातून उडी, तीही पॅराशूटशिवाय! | पुढारी

विमानातून उडी, तीही पॅराशूटशिवाय!

उत्तर कॅरोलिया : स्वतःचे फोटो, व्हिडीओ काढण्याची आवड कित्येकांना असते. मात्र, आपण शूट करत असलेला व्हिडीओ आपला शेवटचा व्हिडीओ ठरेल अशी कल्पनाही कोणी करत नसेल. अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये एक व्यक्तीने विमानातून उडी मारली. पण दैवदुर्विलास म्हणजे तो चक्क पॅराशूट घ्यायलाच विसरला आणि त्याने स्वतःचाच मृत्यू कॅमेर्‍यात कैद केला. ही घटना जुनी असून पुन्हा चर्चेत आली आहे.

स्कायडायव्हर असलेल्या इव्हान मॅकगुयर नावाच्या व्यक्तीसोबत ही घटना घडली होती. 35 वर्षीय इव्हानने एप्रिल 1988 मध्ये 10,000 फूट उंचीवरून विमानातून उडी मारली होती. तो अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिया येथील फँ्रकलिन काऊंटी स्पोर्टस् पॅराशूट सेंटरमध्ये होता. तो हे साहस करताना खूप उत्सूक होता आणि  स्वतःला तो शूटही करत होता. मात्र, उडी मारल्यानंतर काहीच वेळात त्याच्या लक्षात आले की, त्याने पॅराशूटच घेतले नाही आणि त्याने स्वतःचाच मृत्यू रेकॉर्ड केला. इव्हानच्या या अपघातात त्याचे शेवटचे शब्द होते, ‘ओह गॉड नो’!

त्याचा मृतदेह उड्डाण केलेल्या एअरफिल्डपासून 2.4 किलोमीटर अंतरावर जंगलात सापडला. इव्हानने पॅराशूट समजून कॅमेरा उचलला. जवळपास दोघांचे वजन सारखेच असते. त्यामुळे कदाचित इव्हानच्या लक्षात आले नाही. आजपर्यंत ही घटना आजपर्यंत कोणीच विसरू शकले नाही. आताही इंटरनेटवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या
Back to top button