beetroot : बीटमधून मिळतात अनेक आजारांना दूर ठेवणारे घटक | पुढारी

beetroot : बीटमधून मिळतात अनेक आजारांना दूर ठेवणारे घटक

नवी दिल्ली : बीट आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काही लोक या फळाचा रस पितात किंवा भाज्यांमध्ये घालून खातात. यात अनेक जीवनसत्त्वे असतात, जी शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. बीटामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक असतात. त्यांच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच त्वचेसाठीही ते फायदेशीर ठरते. बीटमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीरातील रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

जर रक्ताच्या कमतरतेची समस्या जाणवत असेल तर बीटचा आहारात समावेश करणे अतिशय लाभदायक ठरते. बीटमध्ये असलेले नायट्रेट रक्तदाब कमी करते आणि त्यामध्ये आढळणारे ब्युटेन रक्त गोठण्यापासून वाचवते. अशा प्रकारे हृदयाशी संबंधित आजारांवर बीट उपयुक्त ठरू शकते. यामध्ये फायबर पुरेशा प्रमाणात आढळते, जे पाचन समस्यांवर मात करण्यासाठी उपयुक्त आहे. बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या अन्य समस्यांवर बीटरूटचा रस पिणे हा चांगला उपाय ठरू शकतो. यामुळे अन्न पचण्यास मदत होते. बीटमध्ये असलेले फोलेट आणि फायबर त्वचेसाठी फायदेशीर असतात.

हेही वाचा : 

Back to top button