इंग्लंडमध्ये दिसले इंद्रधनुष्यी ढग | पुढारी

इंग्लंडमध्ये दिसले इंद्रधनुष्यी ढग

लंडन : पावसाच्या थेंबातून सूर्यप्रकाश गेला की आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते, मात्र अशा विविध रंगांचे ढग दिसणे ही एक दुर्मीळ घटना आहे. ईशान्य इंग्लंडमध्ये आकाशात नुकतेच असे इंद्रधनुष्यी ढग दिसून आले.

टिसिडी ते नॉर्थम्बरलँडपर्यंत असे ढग आकाशाची शोभा वाढवत होते. हवामान तज्ज्ञ जेन बार्ट्राम यांनी सांगितले की, असे ढग अतिशय दुर्मीळ असतात. ते वातावरणाच्या उंच स्तरात व अतिशय थंड असतात. बर्फाच्या सूक्ष्म स्फटिकांपासून हे ढग बनलेले असतात.

त्यांच्यामधून सूर्यप्रकाश गेला की तो विखुरला जातो आणि असे इंद्रधनुष्यी रंग तयार होतात. ज्यावेळी वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फिअरमधून अतिशय थंड हवा जात असते त्यावेळीच हे ढग दिसतात. विशेषतः ध्रुवीय वर्तुळाच्या परिसरात असे ढग दिसून येतात. त्यांना ‘मदर ऑफ पर्ल क्लाऊड्स’ असेही म्हटले जाते.

संबंधित बातम्या
Back to top button