Artificial intelligence : आता ‘एआय’ करणार मृत्यूचे भाकीत!

Artificial intelligence : आता ‘एआय’ करणार मृत्यूचे भाकीत!
Published on
Updated on

कोपेनहेगन : जन्ममृत्युजराव्याधी दुःखदोषानुदर्शनम्' असे गीतेत म्हटले आहे. जन्म, मृत्यू, म्हातारपण, आजारपण हे कुणाला चुकलेले नाहीत. अनेकांना भविष्याबाबत कुतुहल असतेच; पण काहींना आपले आयुष्य किती आहे, मृत्यू कधी येणार, याबाबतही जाणून घ्यावेसे वाटत असते. आता 'Artificial intelligence' म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूल हे भाकीत करू शकेल, असा दावा केला जात आहे. या एआय (Artificial intelligence) टूलची माहिती न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. डेन्मार्कच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक सुनी लेहमन यांनी ते विकसित केले आहे.

life2 vec नावाचे हे एआय टूल एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंचे जसे उत्पन्न, व्यवसाय, राहण्याचे ठिकाण इतर गोष्टींबद्दल विश्लेषण करून त्याच्या आयुष्याचा अंदाज लावते. त्याचे अंदाज जवळपास 75 टक्के खरे ठरल्याचे बोलले जात आहे. (Artificial intelligence)

अहवालानुसार लेहमनच्या टीमने 2008 ते 2020 दरम्यान डेन्मार्कमधील 6 दशलक्ष लोकांवर या एआय टूलसाठी संशोधन केले होते. या संशोधनात 1 जानेवारी 2016 दरम्यान लोक आणखी किमान चार वर्षे जगतील अशी अपेक्षा life2 vec च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये लोकांच्या जीवनातील घटना एका क्रमाप्रमाणे बनवल्या गेल्या आणि भाषेतील शब्दांपासून वाक्ये तयार करण्याच्या प्रक्रियेशी तुलना केली. या एआय टूलचे एक्यूरेसी रेट अगदी अचूक होते. (Artificial intelligence)

2020 पर्यंत कोणते लोक मरतील याची कोणतीही चूक न करता अंदाज बांधला होता. त्याची अचूकता दर 75 टक्क्यांहून अधिक होती. या अभ्यासात लवकर मृत्यू होण्यास कारणीभूत घटकही नमूद केले आहेत. हे घटक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या किंवा नोकरी इ. त्याच वेळी, उच्च उत्पन्न आणि नेतृत्व भूमिका यासारखे घटक दीर्घ आयुष्याशी संबंधित असल्याचे आढळले. लेहमनच्या मते नैतिक मूल्यांच्या संदर्भात या अभ्यासात सहभागी असलेल्यांपैकी कोणालाही त्यांच्या जीवनाच्या पूर्वनिदानाबद्दल सांगितले गेले नाही. हे एआय साधन अद्याप सामान्य लोकांसाठी किंवा कॉर्पोरेशन्ससाठी उपलब्ध नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news