बंगळूर : तब्बल 20 कोटी रुपयांचा कुत्रा! | पुढारी

बंगळूर : तब्बल 20 कोटी रुपयांचा कुत्रा!

बंगळूर : माणसाला अनेक प्रकारचे प्राणी पाळण्याची हौस असते. अनेक प्राणी अत्यंत महागडेही असतात. त्यामध्ये विशिष्ट प्रजातीचे घोडे, मासे, मांजरं यांच्यापासून रेड्यांचाही समावेश आहे. काही प्रजातीचे श्वानही अतिशय महागडे असतात. आता बंगळूरमधील सतीश नावाच्या एका व्यक्तीने तब्बल 20 कोटी रुपयांचा श्वान खरेदी केला आहे.

सतीश हे इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशन बंगळूरचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी मी हैदराबादच्या मदीनागुडा येथील एका पेट क्लिनिकमध्ये गेलो होतो. तिथे मला अत्यंत दुर्मीळ कोकेशियन शेफर्ड प्रजातीचा कुत्रा दिसला. हा श्वान मला अतिशय आवडला. ही एक रशियन प्रजाती आहे. त्याची किंमत इतकी आहे की या किमतीत दहा घरे आणि दहा महागड्या गाड्याही खरेदी करू शकता येतात.

अत्यंत दुर्मीळ प्रजातीचा असल्याने मी हा श्वान वीस कोटी रुपयांना खरेदी केला. आजही त्याची बरोबरी करणारी कोणती ब्रीड नाही. तीन वर्षांच्या या कुत्र्याला मांस खाणे आवडते. त्याला रोज तीन किलो चिकन दिले जाते. या श्वानाने आतापर्यंत अनेक मोठ्या डॉग शोमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच सर्वश्रेष्ठ श्वान म्हणून 32 पदकं जिंकली आहेत. त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2016 मध्ये सतीश हे भारतातील पहिले असे व्यक्ती होते ज्यांच्याकडे दोन कोरियन मस्टीफ श्वान होते. त्यांची किंमत प्रत्येकी एक कोटी रुपये होती. हे श्वान त्यांनी कोरियातून नव्हे तर चीनमधून मागवले होते.

Back to top button