पॅलेडियम... सोन्यापेक्षा महाग असलेला धातू | पुढारी

पॅलेडियम... सोन्यापेक्षा महाग असलेला धातू

लंडन : सोन्यापेक्षाही महागडे असलेले अनेक धातू आहेत. त्यापैकी आपल्याला केवळ प्लॅटिनमची माहिती असते. मात्र अन्यही अनेक दुर्मीळ व चमकदार धातू आहेत जे अत्यंत महागडे असतात. अशाच धातूंमध्ये पॅलेडियमचा समावेश होतो. दहा ग्रॅम सामान्य पॅलेडियमची किंमत 60 हजार रुपये आहे. चांगल्या पॅलेडियमची किंमत दहा ग्रॅमला 80 हजार रुपये आहे.

दक्षिण आफ्रिकेत पॅलेडियमला प्लॅटिनमच्या एका बायप्रॉडक्टसारखे काढले जाते. रशियात ते निकेलच्या बायप्रॉडक्टसारखे काढले जाते. या दोन्ही ठिकाणी पॅलेडियम अधिक प्रमाणात आढळते. त्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने त्याला अधिक किंमत मिळते. या चमकदार धातूचा वापर गाड्यांच्या उत्सर्जन प्रणालीत होतो. तो नुकसानकारक तत्वांना कार्बन डायऑक्साईड आणि वाफेत बदलतो.

पेट्रोल गाड्यांच्या एक्झॉस्टमध्ये वापरले जाणारे कॅटेलिस्टही यापासून बनवले जाते. याशिवाय दागिन्यांमध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तसेच दंत चिकित्सेतही त्याचा वापर होतो. 2000 सालापासून त्याच्या किंमती 900 टक्के वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या
Back to top button