दागिन्यांचे मास्टरपीस असलेले ब्रेसलेट!

दागिन्यांचे मास्टरपीस असलेले ब्रेसलेट!

कैरो : तुतेनखामेनला राजा तूत या नावानेही ओळखले जायचे. हा प्राचीन इजिप्तमधील राजा होता. त्याने ख्रिस्तपूर्व 1332 ते 1323 या कालावधीत राज्य केले. तुतेनखामेनच्या बालपणी त्याच्यासाठी एक स्कॅरेब ब्रेसलेट बनवले गेले. याचे वैशिष्ट्य म्हणजे, प्राचीन इजिप्तमधील सर्व दागिन्यांमधील मास्टरपीस म्हणून या ब्रेसलेटची ओळख आहे.

आता हे ब्रेसलेट का तयार करण्यात आले, याचा किस्सा मात्र हैराण करणारा आहे. इजिप्त म्युझियम वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हे स्कॅरेब ब्रेसलेट अतिशय अद्भुत डिझाईनचा उत्तम नमुना आहे. हे ब्रेसलेट सोन्यापासून तयार केले गेले आहे. त्याच्या वरील भागात निळ्या रंगाचे स्कॅरेब बीटर आहे. याशिवाय, लापीस-लाजुली, कारेलियन, फिरोजासारखा महागड्या माणकांनी ते सजवले गेले आहे.

प्राचीन इजिप्तमध्ये स्कॅरेबला देवतासमान मानले जाते. त्या संस्कृतीत स्कॅरेबला सूर्योदय, पुनर्जन्म व सुरक्षेचे प्रतीक मानले जाते. या ब्रेसलेटचे डायमीटर अतिशय लहान आहे. त्यामुळे, तुतेनखामेन राजाच्या लहानपणी त्याला सुयोग्य असे हे ब्रेसलेट तयार केले गेले होते, हे सुस्पष्ट होते. स्कॅरेब ब्रेसलेट सौभाग्य आणते आणि अनिष्ट शक्तींना दूर ठेवते, असेही मानले जाते. सूर्यदेवतेचे प्रतीक म्हणूनही स्कॅरेबला इजिप्त संस्कृतीत मान्यता मिळाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news