46 वर्षांपूर्वीच्या ‘व्होएजर-1’ कडून डेटा येणे थांबले

46 वर्षांपूर्वीच्या ‘व्होएजर-1’ कडून डेटा येणे थांबले

वॉशिंग्टन : 'नासा'च्या 'व्होएजर-1' या यानाकडून पृथ्वीकडे कोणताही वैज्ञानिक किंवा सिस्टीम्स डेटा पृथ्वीकडे पाठवला जाणे सध्या बंद झाले आहे. या 46 वर्षांपूर्वीच्या यानाला कमांडस् रिसिव्ह करता येतात; पण या प्रोबच्या कॉम्प्युटर्समध्ये काही बिघाड निर्माण झाल्याने त्याला डेटा ट्रान्समिट करणे सध्या शक्य होत नाही.

'व्होएजर 1'ची फ्लाईट डेटा सिस्टीम (एफडीएस) ही यानाच्या विविध वैज्ञानिक उपकरणांकडून ऑनबोर्ड इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन आणि डेटा गोळा करते. मात्र, सध्या ही सिस्टीम पृथ्वीवरील यंत्रणांशी संवाद साधत नाही. यानाच्या टेलिकम्युनिकेशन्स यूनिटकडून असा संवाद अपेक्षित असतो. मात्र, सध्या तो बंद पडलेला आहे. याबाबतची माहिती 'नासा'ने एका ब्लॉग पोस्टमधून दिली आहे.

ज्यावेळी काम सुरळीत सुरू असते त्यावेळी 'एफडीएस' यानाची माहिती एका डेटा पॅकेजमध्ये गोळा करते आणि ती 'टीएमयू'च्या माध्यमातून पृथ्वीकडे पाठवते. 'व्होएजर-1' आणि त्याचे जुळे यान 'व्होएजर-2' ही दोन याने 1977 मध्ये पाठवण्यात आली होती. ती आता पृथ्वीपासून 24 अब्ज किलोमीटर अंतरावर गेलेली आहेत. त्यांच्याकडे एक ट्रान्समिशन पाठवण्यासाठी एका दिवसाचा कालावधी लागतो. तसेच यानाकडून प्रतिसाद मिळण्यास आणखी एक दिवस जातो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news