बक्‍कळ पगार, मोफत घर, निसर्गरम्य ठिकाण; पण ‘येथे’ कुणी येईना! | पुढारी

बक्‍कळ पगार, मोफत घर, निसर्गरम्य ठिकाण; पण 'येथे' कुणी येईना!

कॅनबेरा : पैसै मिळवण्यासाठी लोक कोणत्याही देशात जातात; पण एक देश असा आहे जिथे लोकांना कामावर जायचं नाहीये. इथे अगदी छोट्या कामासाठीही लाखो रुपये पगार दिले जातात, तरीही कित्येक जागा रिक्त राहतात. पण इथे अशी परिस्थिती का आहे?

आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत तो आहे ऑस्ट्रेलिया. गेल्या दोन वर्षांपासून हा देश चर्चेत आहे, कारण इथे कामासाठी कित्येक उत्कृष्ट ऑफर दिल्या जात आहेत. असे असूनही या पदांवर काम करण्यासाठी लोक उपलब्ध नाहीत. काही महिन्यांपूर्वी इथे डॉक्टरच्या नोकरीसाठी कोट्यवधींचा पगार आणि मोफत घर दिलं जात होतं, तरीही कोणीही त्यासाठी तयार नव्हतं. केवळ सुशिक्षितांनाच नोकर्‍यांमध्येच करोडोंच्या ऑफर्स येतात असंही नाही.

इथे खाणींमध्ये आणि तेल खाण उद्योगात काम करणार्‍या कामगारांनाही चांगला पगार दिला जात आहे. यासाठी 6 महिने ते 12 महिन्यांचा करार असून पगारही 50-60 लाख रुपये आरामात मिळतो. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सरकारी आयोगाच्या अहवालात, देशात कौशल्याची कमतरता खूप जास्त असल्याचे सांगण्यात आले होते. 2021 पासून हे प्रमाण वाढत आहे आणि देशात नोकरीसाठी हजारो जागा रिकाम्या आहेत. सरकारचे मंत्री इतर देशांमध्ये जाऊन लोकांना इथे काम करण्याची ऑफर देत आहेत आणि त्याचे फायदे सांगत आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये आरोग्य सेवा क्षेत्रात हजारो नोकर्‍या आहेत. विशेषत: परिचारिका, सहायक आणि डॉक्टरही येथे उपलब्ध नाहीत. इतकंच नव्हे तर सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामरसह बांधकाम व्यवस्थापक म्हणजेच कंत्राटदारांचीही येथे गरज आहे, परंतु तेही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत सरकारकडून इमिग्रेशन धोरणातही बदल करण्यात येत आहेत, जेणेकरून बाहेरून लोक येथे येतील. इथे नोकरदारांच्या कमतरतेचं कारण म्हणजे लोक ऑस्ट्रेलियात शिकायला जातात; पण तिथे कोणीही राहू इच्छित नाही. हा देश खूप सुंदर असला तरी लोकांना तिथे आपलं घर बनवायचं नाही. मात्र, हे देखील वास्तव आहे, की कठोर बॉर्डर रूल्स आणि व्हिसा नियमांमुळे लाखो लोकांचे व्हिसाचे अर्ज प्रलंबित राहतात. मात्र, एकदा इथे पोहोचल्यानंतर ट्रक चालवूनही 50-60 लाखांची कमाई होऊ शकते, असे इथे राहणारे ट्रकचालक अ‍ॅशले सांगतात.

Back to top button