2023 मध्ये ‘या’ मुलीच्या व्हिडीओला सर्वाधिक ‘व्ह्यूज’

2023 मध्ये ‘या’ मुलीच्या व्हिडीओला सर्वाधिक ‘व्ह्यूज’
Published on
Updated on

न्यूयॉर्क : सरत्या वर्षाला निरोप देताना मनात एक प्रश्न येतो. या वर्षात काय काय घडलं? हे वर्ष राजकारण, बॉलीवूडसह सोशल मीडियावरही अनेक व्हिडीओंमुळे गाजले. 2023 मध्ये सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ सर्वाधिक वेळा पाहिला गेला हे माहिती आहे का? एक कृष्णवर्णीय मुलगी मेकअप करीत असतानाचा व्हिडीओ सर्वाधिक वेळा पाहिला गेला आहे. त्वचेचा नैसर्गिक रंग न बदलता आपण कसे सुंदर दिसू शकतो हे तिने यामधून दाखवून दिले.

सौंदर्य प्रसाधन आणि सौंदर्यात भर पडावी म्हणून अनेक घरगुती उपाय सांगण्यात येतात. केस, त्वचा, मेकअप यासाठी सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ अपलोड केलेले पाहायला मिळतात. एका डेटानुसार मॉडेल न्याडोली डेंगच्या मेकअप ट्युटोरियलला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ या वर्षी मार्चमध्ये अपलोड केला गेला होता. या व्हिडीओला 504 दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मॉडेल न्याडोलीने हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरही शेअर केला होता.

यात तिने विविध मेकअप उत्पादने वापरून मेकअप करण्याचे तंत्र सांगितले आहे. त्याशिवाय कोणत्या कंपनीचे उत्पादन तिने वापरले आहे त्याबद्दल तिने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. या व्हिडीओला सर्वाधिक व्ह्यूजसोबत कमेंट बॉक्समध्येही सर्वाधिक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. नेटकर्‍यांनी मॉडेल न्याडोलीचे खूप कौतुक केले आहे. तिने या व्हिडीओमध्ये ज्या प्रकारे मेकअप केले आहे ते पाहून नेटकरी खूश झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकर्‍यांनी तिला 'ब्लॅक ब्युटी' अशी उपमा दिली आहे. तर काही लोकांनी म्हटले आहे की, तिचा रंग सर्वात सुंदर रंग आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news