

कॅलिफोर्निया : अमेरिकन संशोधकांनी अतिशय अनमोल असा खजाना शोधून काढला आहे. या संशोधकांनी दक्षिण कॅलिफोर्नियातील एका विशाल सरोवराच्या तळाशी 540 बिलियन डॉलर्सचा एक खजाना मिळवला आहे. पांढर्या सोन्याची खाण म्हणून त्याला ओळखले जाते. हा लिथियमचा प्रकार असून पांढर्या वाळूप्रमाणे दिसत असल्याने त्याला पांढरे सोने म्हणूनही ओळखले जाते.
इंडी 100 च्या एका वृत्तानुसार, सॉल्टन हे अमेरिकन राज्यातील सर्वात मोठे सरोवर आहे. स्टडी डिपार्टमेंट ऑफ एनर्जीकडून वित्त सहाय्य असलेल्या रिसर्चच्या रूपाने त्याचा अभ्यास केला जात होता. सरोवराच्या तळाशी किती लिथियम आहे, याचा यात शोध घेतला जात होता. सध्या तेथे 18 दशलक्ष टनपर्यंत लिथियम जमा असेल, इतके सोने असेल, असा अंदाज आहे. ड्रीलिंगच्या माध्यमातून पहिल्या टप्यात लिथियम शोधले गेले. या इतक्या मोठ्या प्रमाणात लिथियम सापडल्याने त्याचा अमेरिकेला उत्तम लाभ होईल, असे संकेत आहेत.
या माध्यमातून 382 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनांकरिता बॅटरी तयार करणे शक्य होईल आणि यामुळे अमेरिका चीनला पिछाडीवर टाकत
रासायनिक क्षेत्रात अग्रस्थानी येईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात भू रसायन विभागातील प्रा. मायकल मॅककिबेन यांनी जगातील हे सर्वात मोठे भांडार असल्याचे याप्रसंगी सांगितले. इतक्या मोठ्या प्रमाणात लिथियम सापडल्याने आता अमेरिकेला चीनमधून आयातीसाठी अवलंबून रहावे लागणार नाही, हे देखील स्पष्ट आहे.