अडीच टन वजनाचा अजस्र मासा! | पुढारी

अडीच टन वजनाचा अजस्र मासा!

मेक्सिको : समुद्रात अनेक प्रकारचे मासे आढळून येतात. त्यातील सर्वात अजस्र मासा म्हणून ओशन सनफिशला ओळखले जाते. जगभरातील सर्वात जड मासा अशी ओशन सनफिशची ओळख आहे. आश्चर्य म्हणजे या माशाचे वजन चक्क अडीच टनांपर्यंत असू शकते. हा मासा दिसण्यातही अजस्त्र असतो. भव्यदिव्य, विशालकाय आकारमानामुळे हा मासा समुद्रात पोहतानादेखील एखाद्या एलियन शिपप्रमाणे भासतो.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रेनमेकर या युझरने ओशन सनफिशचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या माशाचे वजन 2300 ते 2500 किलोग्रॅम असू शकते. शिवाय, त्याची पटले 4.2 मीटर्सपर्यंत असू शकते. ओशन सनफिशचे शास्त्रीय नाव मोला असे आहे. हा सर्वाहारी मासा म्हणून ओळखला जातो आणि त्याचे वयोमान 10 वर्षे असू शकते.

मनुष्याच्या द़ृष्टीने हा मासा उपद्रवकारक असत नाही. शार्क व रेज यापेक्षा अधिक भारी असू शकतात. पण, ते कार्टिलाजिनस असतात. नॅशनल जिओग्राफिकच्या एका रिपोर्टनुसार, लॅटिनमध्ये मोला या शब्दाचा अर्थ मिल स्टोन असा होतो आणि हा शब्द ओशन सनफिशच्या गोलाकार आकाराचे वर्णन करणारा आहे. या माशाचा रंग चंदेरी असतो आणि विशेषत: उष्ण कटिबंधातील महासमुद्रात तो आढळून येतो. भव्य, विशाल आकारमानामुळे काही वेळा तो शार्कसारखाही भासतो.

Back to top button