मनुष्याला कसे त्रस्त करावे, हे ही आठवणीत ठेवतात जीवाणू! | पुढारी

मनुष्याला कसे त्रस्त करावे, हे ही आठवणीत ठेवतात जीवाणू!

ह्यूस्टन : जीवाणूंना विचार करण्याची ताकद असत नाही. पण, ते वातावरणाची माहिती एकत्रित करण्यासाठी सक्षम असतात. अगदी मनुष्याला सातत्याने कसे त्रस्त करता येईल, याचीही ते आठवण ठेवत असतात, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी यावर अभ्यास केला.

कोणकोणती रणनीती मनुष्यात धोकादायक संक्रमणासाठी कारणीभूत ठरु शकतात, यावर जीवाणू माहिती आठवणीत ठेवत असतात. यामुळेच ते अँटिबायोटिक औषधांविरोधातही ते मजबूत राहू शकतात. असे नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे. जीवाणूंकडे मेंदू असत नाही, पण ते वातावरणाची माहिती एकत्रित ठेऊ शकतात आणि परिस्थिती आल्यानंतर ते यातून आपला बचाव करू शकतात. ई कोली या नावाचे जीवाणू अधिक परिणामकारक ठरतात.

सौविक भट्टाचार्य यांच्या मते मनुष्याप्रमाणे जीवाणूत न्यूरॉन्स, सिनॅप्स किंवा तंत्रिका असत नाहीत, पण झुंड रूपात असलेल्या जीवाणूत माहिती एकत्रित ठेवण्याची कला असते. यावर बीमोड करण्यासाठी आता पुढील संशोधनात भर दिला जाणार आहे.

Back to top button