हाडेही चूर चूर करू शकणारे शक्तिशाली निओडिमियम चुंबक!

हाडेही चूर चूर करू शकणारे शक्तिशाली निओडिमियम चुंबक!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : निओडिमियम चुंबक जगभरातील सर्वात शक्तिशाली चुंबक म्हणून ओळखले जाते. ज्यावेळी भिन्न ध्रुवांच्या निओडिमियम चुंबकांना एकमेकांजवळ आणले जाते, त्यावेळी ते वेगाने एकमेकांना चिकटतात की, त्यांची बॉडी चुंबकीय ताकद देखील सहन करू शकत नाही आणि काही वेळा तर हा वेग इतका प्रचंड असतो की, ते यात चूर चूर होऊन जातात. सध्या याचाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर चुंबकाचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात चुंबक किती शक्तिशाली असतो, हे अधोरेखित होते. आतापर्यंत हा व्हिडीओ 80 हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. हा चुंबक निओडिमियम, लोखंड व बोरॉनच्या मिश्रणाने तयार केले जाते.

या चुंबकांचे चुंबकीय बळ त्याच्या आकारावर देखील अवलंबून असते. काही घन सेंटीमीटर्सपेक्षा अधिक निओडिमियम चुंबकांमध्ये इतके मजबूत मॅग्नेटिक फोर्स असते की, दोन चुंबकांदरम्यान एक चुंबक व लोखंड धातू पटलादरम्यान मनुष्य शरीराचे एखादे अंग सापडले तर त्याचा अक्षरश: चेेंदामेंदा होऊ शकतो.

चुंबकात दक्षिण व उत्तर ध्रुव असतात. समान ध्रुवांची दोन चुंबके एकमेकांना दूर ढकलतात तर विरोधी ध्रुवांची चुंबके एकमेकांना आपल्या बाजूने खेचतात. विरोधी ध्रुवांची चुंबके एकमेकांना चिकटली तर त्यांना विलग करणे निव्वळ कठीण असते. मात्र, या चुंबकांची एकच कमकुवत बाजू असते की, आगीच्या संपर्कात आले तर त्यांची चुंबकीय ताकद संपुष्टात येते आणि ते निव्वळ धातू रूपात बाकी राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news