

बीजिंग : जगभरात अनेक प्रकारचे मासे आढळून येतात. काही मासे अगदीच छोटे असतात तर काही विशाल आकाराचे मासे अक्षरश: अवाक् करायला लावणारे असतात. काही माशांचे दात अगदी मनुष्याच्या दंतपक्तीसारखे असतात, पण एखाद्या मनुष्यासारखा चेहरा असणारा मासा कोणी क्वचितच पाहिला असेल! जलपरीच्या कित्येक कहाण्या आपण अनेकांनी ऐकले असतील. त्यासारखे काहीही आढळत नाही. पण, चीनमधील एका तलावात एक जलपरीसारखा असाही मासा आहे, ज्याचा चेहरामोहरा चक्क एखाद्या मनुष्यासारखा आहे आणि हा मासा पोहत पोहत आपला चेहरा दाखवतो, त्यावेळी पाहणारी व्यक्ती निव्वळ थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
हा अजब मासा चीनच्या एका तलावात आढळून आला आहे. दक्षिण चीनमधील कुनपिंगनजीक एका गावात हा मासा दिसून आला आणि काहींनी त्याचा व्हिडीओ देखील केला. हा मासा तलावाच्या किनार्यानजीक येत असताना त्याचा चेहरा अधेमधे पाण्याच्या वर येताना दिसून आला. त्याच्या डोक्यावर काळे डाग होते आणि ते मनुष्याच्या डोळ्याप्रमाणे दिसून येत होते.
हा मासा व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला. काहींनी हा मासा नव्हे तर जलपरी आहे, असे म्हटले तर काहींनी असा मासा खाता कसा येईल, असा प्रश्न उपस्थित केला. काहींनी याला एलियन असे म्हटले तर काहींनी या माशाची किंमत 42 लाखांपेक्षा जास्त असू शकते, असाही जावईशोध लावला!