‘पॅनिक अटॅक’ पासून कसा करावा बचाव? | पुढारी

‘पॅनिक अटॅक’ पासून कसा करावा बचाव?

नवी दिल्ली : अनेकदा काही कारणास्तव आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल सतत चिंता जाणवत असते. किंवा कधी कधी कामाच्या वाढत्या ताणामुळे तणाव जाणवत असतो. अशावेळी चिंता आणि तणाव यांना कधीच हलक्यात घेण्याची चूक करू नका. कारण यामुळे इतर अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यापैकी एक म्हणजे पॅनिक अटॅक. एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंता केल्याने पॅनिक अटॅक येऊ शकतो. पॅनिक अटॅक हा अचानक झालेला हल्ला आहे, जो अत्यंत वेदनादायक असू शकतो. हा झटका हृदयविकाराच्या झटक्यासारखा वाटतो ज्यामध्ये रुग्ण स्वतःवरील नियंत्रण गमावतो. पॅनिक अटॅक हा धोकादायक नसतो, परंतु त्याचा तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ही परिस्थिती कशी हाताळायची हे जाणून घेणं गरजेचं आहे.

दीर्घ श्वास घ्या आणि मोजत राहा

तुमच्या आजूबाजूला एखाद्याला पॅनिक अ‍ॅटॅक येत असल्यास, त्यांना बसायला सांगा आणि दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू मोजायला सांगा. जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला पॅनिक अ‍ॅटॅक येत असेल तर तुम्हाला हा उपाय स्वतःच करून पाहावा लागेल. आत आणि बाहेर एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सामान्य होईपर्यंत मोजत राहा.

बर्फ किंवा थंड पाण्याचा गारवा

पॅनिक अ‍ॅटॅकमध्येही थंड पाणी खूप आराम देते. पॅनिक अ‍ॅटॅक आल्यास चेहरा थंड पाण्याने धुवावा. जर ते थंड पाणी असेल तर आणखी चांगले. चेहर्‍यासह मान पुसून टाका. आपल्या डोक्यावर एक थंड टॉवेल ठेवा. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

शारीरिक हालचाल करा

जर तुम्हाला याआधी कधीही पॅनिक अ‍ॅटॅक आला असेल, तर ही परिस्थिती पुन्हा टाळण्यासाठी शारीरिक व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. शारीरिक हालचाली केल्याने एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे मनःस्थिती सुधारते आणि मन शांत होते. तणाव आणि चिंता कमी करून पॅनिक अ‍ॅटॅकचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे या हालचाली सतत करत राहा.

Back to top button