आपल्या आकाशगंगेतील कृष्णविवराचा वेग विक्रमी | पुढारी

आपल्या आकाशगंगेतील कृष्णविवराचा वेग विक्रमी

वॉशिंग्टन : प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक कृष्णविवर असते. आपली सौरमालिका ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे त्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानीही असेच एक शक्तिशाली (सुपरमॅसिव्ह) कृष्णविवर आहे. त्याचे नाव आहे ‘सॅजिटेरीयस ए’. या कृष्णविवराच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेगावर आता एक नवे संशोधन झाले आहे. हे कृष्णविवर इतक्या विक्रमी वेगाने फिरत आहे की ते आपल्या चहुबाजूच्या अवकाश व काळाला (स्पेस-टाईम) बदलत आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

स्पेस-टाईम हे चार आयामी फॅब्रिक आहे जे अंतराळात ग्रह आणि तार्‍यांसारख्या मोठ्या खगोलांच्या चारही बाजूंनी झुकते. संशोधकांच्या एका टीमने ‘नासा’च्या चंद्रा एक्स-रे ऑब्झर्व्हेटरीच्या माध्यमातून ‘सॅजिटेरियस ए’ या कृष्णविवराचे निरीक्षण केले. हे कृष्णविवर पृथ्वीपासून 26 हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहे. चंद्रा एक्स रे ऑब्झर्व्हेटरी ही अंतराळातील एक दुर्बिण आहे जी ब्रह्मांडाच्या उष्ण क्षेत्रातून एक्स-रे उत्सर्जनचा छडा लावण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.

संशोधकांनी या कृष्णविवराच्या चारही बाजूंनी फिरत असलेल्या सामग्रीपासून रेडिओ लहरी आणि एक्स-रे उत्सर्जनची तपासणी केली. तिला ‘अ‍ॅक्रेशन डिस्क’ म्हणजेच ‘अभिवृद्धी डिस्क’ म्हणून ओळखले जाते. या पद्धतीने त्यांनी ‘सॅजिटेरियस ए’च्या घूर्णन गतीच्या गणनेला मदत मिळाली. याबाबतच्या संशोधनाची माहिती रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी या सिद्धांताची पुष्टी केली आहे की कृष्णविवर फिरत आहे ज्याला ‘लेन्स थिरिंग इफेक्ट’ म्हणून ओळखले जाते. पेन स्टेट युनिव्हर्सिटीतील प्राध्यापिका व मुख्य संशोधिका रुथ डेली यांनी सांगितले की लेन्स-थिरिंग प्रभाव अशावेळी असतो ज्यावेळी एक कृष्णविवर आपल्या फिरण्याबरोबरच स्पेस-टाईमलाही खेचून घेतो.

संबंधित बातम्या
Back to top button