Black Hole : दर ७६ मिनिटांनी पृथ्वीच्या दिशेने होतो किरणोत्सर्ग

Black Hole : दर ७६ मिनिटांनी पृथ्वीच्या दिशेने होतो किरणोत्सर्ग

वॉशिंग्टन : प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक कृष्णविवर असते. आपल्या 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रभागीही असेच एक कृष्णविवर आहे. या शक्तिशाली कृष्णविवराजवळ असलेल्या एका अवकाशीय घटकापासून दर ७६ मिनिटांनी हाय-एनर्जी गामा-रेजचा पृथ्वीच्या दिशेने मारा होत असतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. हे नेमके काय गूढ आहे, याचा उलगडा करण्यात आता संशोधकांना यश आले आहे.

नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोमधील दोन अ‍ॅस्ट्रोफिजिस्टनी याबाबतचे संशोधन केले. कृष्णविवराभोवती फिरणार्‍या वायूच्या एका गोळ्यापासून हा किरणोत्सर्ग होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गामा किरणांच्या या भडीमाराचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या एक तृतीयांश इतका आहे. या संशोधनामुळे 'मिल्की वे'च्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराबाबतच्या अनेक रहस्यांचा उलगडा होण्यास मदत होऊ शकते. या कृष्णविवराला 'सॅजिटेरियस ए प्लस' असे अधिकृत नाव देण्यात आले आहे. हे कृष्णविवर पृथ्वीपासून 26,700 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. तेथून होणार्‍या गामा किरणांच्या उत्सर्गाचा छडा सर्वप्रथम २०२१ मध्ये लागला होता. त्यावेळेपासून याबाबतचे गूढ निर्माण झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news