New York : गेल्या वीस वर्षांपासून ‘या’ झाडातून येत आहे पाणी! | पुढारी

New York : गेल्या वीस वर्षांपासून ‘या’ झाडातून येत आहे पाणी!

न्यूयॉर्क : निसर्गातील प्रत्येक झाडाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या खास वैशिष्ट्यांमुळे त्या झाडांना एक वेगळीच शोभा येत असते. मात्र, एक झाड असे आहे, ज्याच्यामधून गेल्या दोन दशकांपासून पाण्याचा फवारा येत आहे.

सध्या सोशल मीडियावर या झाडाचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. मॉन्टेनेग्रोमधील डिनोसा गावात 150 वर्षांपूर्वीचे हे झाड आहे. विशेष बाब म्हणजे 1990 च्या दशकापासून या झाडातून पाणी वाहते आहे. तसेच मुसळधार पाऊस पडला की, या झाडातून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होतो. तसेच हे केवळ एक-दोन वर्षांपासून नाही, तर 20 ते 25 वर्षांपासून घडत आहे. 150 वर्षे जुन्या असणार्‍या या झाडाच्या परिसरात अनेक भूमिगत झरे आहेत.

जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा हे झरे ओसंडून वाहतात. तसेच अतिरिक्त दाबामुळे हे पाणी झाडाच्या पोकळ खोडातूनही वाहू लागते. बर्‍याचदा दाब इतका जास्त असतो की, हे पाणी अतिशय वेगात झाडामधून येऊ लागते. तसेच हे 20-25 वर्षांपासून घडते आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Back to top button