

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नौदलार्वेलन्स एअरक्राफ्ट अर्थात नौदलाचं एक गस्त घालणारं विमान लँडिंगच्याच वेळी गडबडलं आणि हवाईनजीक असणार्या ओहू नावाच्या बेटाजवळच ते समुद्राच्या पाण्यात गेलं. सोमवारी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. बोईंग पोसायडन 8 ए नावाचं हे विमान मरीन कॉर्प्स बेसवरील रनवेपासून थोडं पुढे गेलं आणि केनोहे खाडी क्षेत्रात त्याचा अपघात झाला. उपलब्ध माहितीनुसार या अपघातात क्रू किंवा प्रवास करणार्या कोणााही दुखापत झाली नाही; पण अपघाताचं स्वरूप काळजाचा ठोका चुकवणारं होतं.
सोशल मीडियावर समोर आलेल्या माहितीनुसार आणि काही फोटो, व्हिडीओनुसार अमेरिकेच्या नौदलाच्या या विमानाचा काही भाग समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसत आहे. हवामान विभागातील अधिकार्यांच्या माहितीनुसार पाऊस, ढगांची दाटी, कमी द़ृश्यमानता आणि आव्हानात्मक हवामानामुळं हा अपघात झाला. अधिकृत माहितीनुसार अपघात झाला त्यावेळी दृश्यमानता अवघी 1.6 कि. मी. आणि वार्याचा वेग 34 कि.मी. इतका होता. हा अपघात झाल्यानंतर एकच गोंधळ माजला. विमानातील लोकांनी कसंबसं विमानातून बाहेर येत मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मरीन मेजर जॉर्डन फॉक्स यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार संभाव्य धोका पाहता या विमानाच्या चारही बाजूंना तातडीनं बचावकार्य हाती घेत बूथ उभारण्यात आले, ज्यामुळं त्यातील या प्रवाशांचा जीव वाचला.