नवी दिल्ली : हिवाळ्यात थंडी टाळण्यासाठी फक्त उबदार कपडे घालणे पुरेसे नाही, शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हिवाळ्यात अनेक प्रकाराच्या पालेभाज्या मिळतात, ज्यामध्ये भरपूर पोषक असतात. याच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. अशा भाज्यांची ही माहिती…
मेथी – हिवाळ्यात मेथीची हिरवी पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. मेथीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. या पानांमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-ई, फायबर आणि अनेक पोषक तत्त्वे आढळतात, ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पालक – पालक हा पोषक तत्त्वांचा खजिना आहे, हिवाळ्यात पालकाचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळू शकता.
पालकमध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक आढळतात, जे अनेक रोग बरे करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. गाजर – लोकांना हिवाळ्यात गाजर खायला आवडते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये लोह, पोटॅशियम, तांबे, मँगनिज इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात, जे अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. गाजरातील जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. याशिवाय डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासही याचा फायदा होतो. मुळा- हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. तज्ज्ञांच्या मते मुळ्यात असलेले व्हिटॅमिन सी, फॉलिक, अँथोसायनिन अनेक धोकादायक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.